Karnataka assembly election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आज घोषणा, सकाळी ११:३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद | पुढारी

Karnataka assembly election 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आज घोषणा, सकाळी ११:३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय निवडणूक आयोग आज बुधवारी सकाळी ११:३० वाजता कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Karnataka assembly election 2023) तारखांची घोषणा करणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवनातील प्लेनरी हॉलमध्ये निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभेच्या २२४ जागा असलेल्या कर्नाटकामध्ये सध्या सत्ताधारी भाजपचे ११९ आमदार आहेत, तर काँग्रेसचे ७५ आणि त्याचा मित्रपक्ष JD(S) चे २८ आमदार आहेत.

विधानसभा निवडणूक (Karnataka assembly election 2023) तोंडावर असताना भाजप, काँग्रेस आणि जेडी(एस) या राजकीय पक्षांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. बोम्मई यांचा कन्नडिगांच्या मुद्द्यावर तसेच मुस्लिम समाजासाठी धर्मावर आधारित आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वोक्कलिगा समुदायांना आरक्षण देण्यावर भर आहे. याबाबत राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकचा अनेकवेळा दौरा केला आहे. त्यांनी अनेकवेळा कर्नाटक हे भाजपचे “दक्षिणेचे प्रवेशद्वार” असल्याचे म्हटले आहे. शाह यांनी नुकतीच सोमवारी बंगळूर येथे राज्य भाजप कोअर कमिटी आणि निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक घेतली होती. याआधी अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचे कौतुक करत दोघांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले प्रशासन दिल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा :

Back to top button