पुणेकरांमध्ये वाढते आहे स्पोर्ट्स बाइक्स, आलिशान गाड्यांची क्रेझ | पुढारी

पुणेकरांमध्ये वाढते आहे स्पोर्ट्स बाइक्स, आलिशान गाड्यांची क्रेझ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूर्वी पुणेकर नागरिक खिशाला परवडणारी आणि दमदार अ‍ॅव्हरेज देणारी वाहने खरेदी करण्यावर भर देत. परंतु, सध्या नागरिक, तरुणाई स्पोर्ट्स बाइक आणि आलिशान गाड्या खरेदी करण्यास पसंती देत आहेत. कोरोना काळानंतर वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वाहनांमध्येसुद्धा मोठे बदल झाले आहेत. यात वाहनाची अत्याधुनिक प्रणाली, मॉडेल्स आणि त्याचे विविध फायदे यामुळे नागरिक सध्याच्या घडीला वाहन खरेदीवर उत्तम भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सर्वसामान्यांचीसुद्धा वाहन खरेदी जोरात…
अगोदर वाहन खरेदी करायचे, तर त्यासाठी एक ठराविक वर्ग समोर येत असे. आता मात्र वाहन विक्रीच्या दुकानांमध्येच कमी व्याजदरात कर्जप्रक्रिया उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचीसुद्धा वाहन खरेदी वाढली आहे.

वाहनांची ई-पर्वाकडे वाटचाल…
सध्याच्या काळात वाहनविश्वामध्ये मोठे बदल होत आहेत. पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर
धावणार्‍या वाहनांसोबतच आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढ होत असून, पुण्यामध्येसुद्धा
ई-वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आगामी काळात वाहन विक्री वाढणार
कोरोना काळापूर्वी जशी वाहन विक्री सुरू होती, तशीच वाहनांची विक्री सध्या सुरू आहे. कोरोना काळात वाहनविक्री घटली होती. मात्र, आगामी काळात वाहनविक्रीला मोठा प्रतिसाद मिळणार आहे, असा विश्वास वाहनविक्रेत्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

 

Back to top button