नाशिक : अनिल कदम यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरुवात | पुढारी

नाशिक : अनिल कदम यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाला सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क नाशिक : निफाड तालुक्यात सहकार विभागाने राजकीय दबावाखाली शासकीय नियम डावलून नोंदणी केलेल्या दहा नवीन विविध कार्यकारी सोसायट्यांची नोंदणी रद्द करावी व त्या सोसायट्यांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेले बेकायदेशीर कर्जवाटपात दोषींवर कारवाई करण्याची मागणी तसेच सहकार विभागातील गैरकारभाराविरोधात निफाड तालुका शिवसेनेच्या वतीने आजपासून (दि. 04)  विभागीय सहनिबंधक कार्यालय, गडकरी चौक, नाशिक येथे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह शिवसैनिकांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

माजी आमदार अनिल कदम यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोकुळ गिते, पंचायत समिती निफाड सभापती पंडित आहेर, संदिप टर्ले, गणेश नाठे, जीवन टर्ले व केतन बोरनारे आदींसह शिवसैनिक या उपोषणाला बसले आहेत.

तालुक्यात सुरू असलेल्या सोसायटी निवडणुकीमध्ये स्थानिक राजकीय दबावाखाली पात्र असलेल्या सभासदांना डावलण्यात आले असून, जुन्या संस्थेतही सभासद असणार्‍या अपात्र सभासदांना मात्र निवडणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. निफाड तालुक्यात सहकार विभागाच्या यंत्रणेचा लोकप्रतिनिधींकडून सर्रास दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून केला जातो आहे.

हेही वाचा :

Back to top button