धुळे; यशवंत हरणे : प्रेमविवाह असलेल्या पतीचा विश्वासघात करुन तिने फुलांचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाला जवळ केले. या माहितीमुळे खचलेल्या पती संदीप कुमार दारुच्या आहारी गेला.
मनापासून प्रेम केलेल्या आपल्या पत्नीचा विश्वासघातामुळे तो शिव्यांची लाखोली वाहत होता.
त्यामुळे संदीपचा काटा या प्रेमवीराने मित्राच्या मदतीने काढला. तथापि, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी तपास करुन तिघांना गजाआड केले.
या तपासातून मारेकरी तरुण व तिच्या अनैतिक संबंधाची माहिती पुढे आली.
अधिक वाचा
धुळ्याच्या एका खासगी दवाखान्यात नर्स म्हणून सुनिता (नाव बदलले आहे) काम करत होती. सुनिताने गावातील संदीपकुमार बोरसेशी सुत जुळल्याने प्रेमविवाह केला. यानंतर राजाराणीचा संसार सरवड येथे थाटला गेला.
या प्रेमविवाहाला समाजातून होणारा विरोध डावलून संदीपने तिचा स्वीकार केला. या प्रेमवेलीवर एक फुल देखील उमलले. एक अपत्य झाल्यानंतर शिक्षक असलेल्या संदीपला दारुचे व्यसन लागले. त्यातच त्याची भेट धुळे तालुक्यातील पाडळदे येथील शरद बरोबर झाली.
शरदचा फुलांचा व्यवसाय होता. त्यामुळे त्याचे गावाकडे दररोज जाणे होते. त्यातच त्याच्या नजरेत सुनिता भरली. त्याने तिच्या समवेत जवळीक साधण्यासाठी संदीप बरोबर मैत्रीचे नाटक सुरु केले.
दररोज ही जोड गोळी सोबत बसून मद्यपान करु लागली.
अधिक वाचा
नशा जास्तीची झाल्यानंतर शरद नेहमी संदीपला घरी सोडण्याचे नाटक करत होता. यातून सुनीता बरोबर जवळीक साधण्याचे काम त्याने सुरु केले. दारुमुळे संदीपची शिक्षकाची नोकरी देखिल गेल्याने घरात आर्थिक चणचण सुरु झाली.
अशा संकटाच्या वेळेस सुनिताला शरद जवळचा वाटू लागला.
तिने त्याच्याशी मैत्री संबंध वाढवायला सुरुवात केली. दुसरीकडे घरात सासू असल्याने शरदचा डाव बसत नव्हता. त्यामुळे त्याने दररोज धुळ्याला अपडाऊन करण्यापेक्षा तेथेच खोली घेवून रहण्याचा सल्ला दिला.
यानंतर शरद व संदीप हे धुळ्याजवळ हॉटेलमधे दारु पिण्यास दररोज जावू लागले. अखेर एका दिवशी सुनिता घरी एकटीच असतांना शरद घरी पोहोचला. यावेळी तिने त्याला नर्सच्या नोकरीतून घराचा खर्च चालवणे अवघड झाले.
संदीपच्या दारुच्या नशेमुळे जीवन उद्ध्वस्त झाल्याचे सांगून ती अश्रु ढाळू लागली. त्याने अश्रु पुसण्याचे नाटक करुन तिला जवळ केले.
संदीपच्या व्यसनाने तिला शरदचा हा स्पर्श तिला हवाहवासा वाटू लागला. ती शरदच्या जवळ सरकली. याच दिवशी दोघांमधे अनैतिक प्रेमाला सुरुवात झाली.
एकीकडे प्रेम विवाह असलेल्या संदीपचा विश्वासघात करुन तिने शरदला जवळ केले.
या अनैतिक संबंधाची चर्चा गावात सुरु झाली. याची माहिती संदीपला कळाल्याने त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यामुळे संदीप पूर्णपणे मनातुन तुटला.
संदीपने ही बाब कळाल्यानंतर त्याने शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे या दोघांनी संदीपचा काटा काढण्याचे ठरवले. या कटात शरदने गावातील राकेश कोळीला सहभागी करून घेतले.
एका दिवशी शरदने संदीपला भेटून चुकीची माफी मागत त्याला पार्टीसाठी नेले. सोबत राकेश कोळीही होता.
धुळे शहरातील नगावबारी भागात असलेल्या एका हॉटेलमधे भरपूर दारू त्यांनी संदीपला दिली.
संदीपला गाडीत घेवून गावाच्या दिशेने इन्होवा गाडीने शरद व राकेश निघाले.
यावेळी नशेत असलेल्या संदीपला या दोघांच्या डोळ्यातील सैतान दिसत नव्हता. या दोघांनी ठरवल्याप्रमाणे संदीपला सरवड फाट्यापासून काही अंतरावर त्याला गाडीतून खाली उतरवून त्याला पायी घरी जाण्यासाठी सोडले.
महामार्गावर शुकशुकाट असल्याने संदीप देखिल पायी निघाला. शरद व राकेशने इनोव्हाचा वेग वाढवून संदीपला धडक दिली. यात संदीपचा मृत्यू झाला. खून करुन अपघाताचा बनाव देखिल पोलिसांसमोर तयार झाला.
संदीपच्या नातेवाईकाने शरद व राकेश यांच्या जवळीकची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील यांना दिली.
यानंतर प्रकाश पाटील यांनी रात्रंदिवस तपासाची सूत्रे हलवून फुटेज गोळा केले.
आरोपी शरद राठोड व राकेश कोळी याला पोलिसी हात दाखवताच शरद राठोड पोपटासारखा बोलु लागला. त्यानेच सर्व कट सांगितला.
संदीपच्या नेहमी होणाऱ्या शिवीगाळाला सुनीता व शरद दोघे वैतागले होते.
त्यामुळे काटा काढण्यासाठी अपघाताच्या बनावाची योजना केल्याची माहीती पोलिसांपुढे आली.
घटनास्थळावर सापडलेल्या इनोव्हा गाडीच्या बंफरचे तुकड्यांच्या आधारावर गाडीचा शोध देखील लागला.
त्यामुळे प्रकाश पाटील यांनी शरद व राकेश यांच्यासह तिच्या देखिल मोबाईलचे रेकॉडे काढले.
यात अपघाताच्या बनावाच्या पुर्वी व नंतर तिचे व शरदचे अनेकवेळा संभाषण झाल्याचे दिसले. एपीआय प्रकाश पाटील यांनी तिला पोलिस ठाण्यात आणून विचारणा सुरु केली.
तिने प्रकृतीचे कारण दाखवत पोलिसांवर दडपण आणण्याचे काम सुरु केले.
या सर्व दडपणाला पोलिसांनी भिक न घालता तिला देखिल प्रेम विवाह केलेल्या पतीच्या खूनात गजाआड केले.
अधिक वाचा