भुसावळ नगरपालिकेवर सत्ता भाजपाची मार्गदर्शक राष्ट्रवादीचे | पुढारी

भुसावळ नगरपालिकेवर सत्ता भाजपाची मार्गदर्शक राष्ट्रवादीचे

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा

जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे हेच नेमकं ओळखता येत नाहीये. त्याचे उदाहरण म्हटलं तर भुसावळ नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे, मात्र त्यांचे मार्गदर्शक हे एकनाथ खडसे आहेत जे राष्ट्रवादीत आहेत. उपनगराध्यक्षांकडे नगराध्यक्षांचा पदभार सोपविल्यानंतर त्यांनी एकनाथराव खडसे यांची भेट घेतली.

जिल्ह्यात जिल्हा वर्धा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. तशातच भुसावळ शहर सुद्धा मागे नाही. या ठिकाणी तर भुसावळ नगरपालिकेवर बऱ्याच कालावधीनंतर भारतीय जनता पक्षाचे बहुमतासह सत्ता आली होती. मात्र जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ व मोठे नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भुसावळ नगरपालिका मध्ये विद्यमान नगरसेवकांच्या घरातील मंडळींनी खडसे समर्थक म्हणून एकनाथराव खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता

त्याचेच प्रत्‍युत्तर म्हणजे भुसावळ नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष असलेल्या सोनी संतोष बारसे यांनी नुकताच प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. यानंतर सर्वप्रथम त्यांनी मुक्ताईनगर एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, एकेकाळी भाजपचे सरचिटणीस असलेले भुसावळ नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक सुनील नेवे ही सोबत होते.

यामुळे भुसावळ नगरपालिकेवर झेंडा जरी भाजपाचा असला तरी सत्तेची सर्व सूत्रे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या हातात असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान नगरसेवक लोकनियुक्त नगराध्यक्ष हे पक्षांतर बंदी च्या कायदा अंतर्गत येत असल्याने त्यांनी पक्षांतर केले नसले तरी पूर्णपणे एकनाथराव खडसे यांचे समर्थक असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे भविष्यात भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मताधिक्‍य किंवा जागा किंवा स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचलं का?

Back to top button