Heroin seized : ९० कोटींचे हेरॉईन जप्त, युगांडाच्या दोन महिलांना अटक | पुढारी

Heroin seized : ९० कोटींचे हेरॉईन जप्त, युगांडाच्या दोन महिलांना अटक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठी कारवाई केली आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने कोट्यवधीची हेरॉईन जप्त ( Heroin seized ) केली आहे. नैरोबी (केनिया) येथून अबू धाबी मार्गे आलेल्या युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या नागरिकांकडून १२.९ किलो हेरॉईन जप्त ( Heroin seized )करण्यात आले.

Heroin seized : तीन सुटकेसमधून एकूण १२.९०० किलो क्रिस्टलिन हेरॉईन

जप्त करण्यात आलेल्या अमंली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत अंदाजे ९० कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९०० किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली. गेल्या वर्षभरात दिल्ली सीमाशुल्क विभागाने १०० किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केली आहे. दरम्यान २६ हून अधिक तस्कारांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button