Amravati violence : तर मुंबईत हिंदू जिवंतच राहिला नसता : चंद्रकांत पाटील | पुढारी

Amravati violence : तर मुंबईत हिंदू जिवंतच राहिला नसता : चंद्रकांत पाटील

अमरावती, पुढारी वृत्तसेवा :

1993 मध्ये झालेल्या दंगलीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी पुढाकार घेतला नसता तर कदाचित मुंबईत हिंदू जिवंतच राहिला नसता. (Amravati violence) आता घडलेल्या घटनेवर हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार काही बोलणार आहेत की नाहीत ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. अमरावती (Amravati violence) इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद राज्यातील अमरावती आणि मालेगाव शहरात घडले आहेत. या ठिकाणी झालेल्या हिंसाचारावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातायत.

या ठिकाणी उसळलेल्या दंगलीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापत असून, आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमरावती इथं थेट सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. यावेळी त्यांनी, राज्यात कोणतीही घटना घडली की, त्यामध्ये भाजपचाच हात आहे म्हणत सॉफ्ट टार्गेट केले जाते. मी संजय राऊतांना आव्हान करतो की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या तोडफोडीत कोणाचा हात होता, हे त्यांनी जाहीर करावं.

हिंदू मार नही खायेगा अशीच भावना दोन दिवसांत दिसत आहे. आणि ती उत्स्फूर्त अशीच आहे. 1993 मध्ये झालेल्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंसाठी पुढाकार घेतला होता. तो नसता तर कदाचित आज मुंबईत हिंदू जिवंत राहिलाच नसता, मात्र सध्या बाळासाहेबांचे वारसदार काही बोलणार नाहीत का असा सवाल उपस्थित केला.

ती काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही…

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेला देशाचे सहकार मंत्री अमित शहा भेट देणार आहेत. सत्तेत असताना आपणही या संस्थेला अनेकदा भेट दिली असल्याचे ते म्हणाले.

ही संस्था काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली एक चांगली संस्था आहे.

त्यामुळे शहा हे पवारांना भेटले तर काहीच चुकीचे नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

हे पण वाचा

Back to top button