नंदुरबार: आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल | पुढारी

नंदुरबार: आक्षेपार्ह स्टेटसप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा: सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी नंदुरबार शहरातील एका युवकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नंदुरबार शहरातील भोणे फाटा भागातील एका तरुणाने त्याच्या व्हॉट्सअॅपवर एक आक्षेपार्ह व सार्वजनिक शांतता भंग करणारे स्टेटस ठेवले होते. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुध्द् कठोर प्रतिबंधक कारवाई केली.

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर किंवा इतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह, सार्वजनिक शांतता भंग करणारे व खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ, किंवा पोस्ट प्रसारित करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये. तसेच कोणीही कायदा हातात घेवून सार्वजनिक शांतता भंग करु नये. अशा प्रकरणात त्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button