नाशिक : आदिवासी कष्टकरी रेशनच्या धान्यापासून वंचित

इगतपुरी : रेशनचे धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर बसलेले आंदोलक.
इगतपुरी : रेशनचे धान्य मिळण्यासाठी तहसील कार्यालयाबाहेर बसलेले आंदोलक.
Published on
Updated on

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
तहसील कार्यालयाने आदिवासी, कष्टकर्‍यांना दोन वर्षांपूर्वी रेशनकार्ड दिली. मात्र रेशनकार्डची नावे ऑनलाइन दिसत नसल्याने आदिवासी कष्टकरी रेशनच्या धान्यापासून वंचित राहिले. अनेक वेळा पुरवठा विभागात तक्रार करूनही थातूरमातूर उत्तर मिळत असल्याने अखेर एल्गार कष्टकरी संघटनेने तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.

रेशनकार्ड टोपलीत सजवून बोरटेंबे ते तहसील कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या महिला सदस्यांनी जागरण गोंधळ घालत रेशनकार्ड पूजन करून तहसीलदारांना भेट देण्यात आले. उच्च न्यायालयाने आदिम कातकरी कुटुंबाला तत्काळ रेशनकार्ड देऊन धान्य द्यावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार पुरवठा कार्यालयाकडून कातकरी कुटुंबाला रेशनकार्ड दिले. मात्र त्यांना धान्य दिले जात नसल्याची आंदोलनकर्त्यांची तक्रार आहे. ज्या कुटुंबाला कार्ड दिले आहेत त्यांना तत्काळ धान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे, संतोष ठोंबरे, गणपत गावंडा, तानाजी कुंदे, राजू भगत, बाळू उघडे, काळू भस्मे, मंगल खडके, नवनाथ निबकेर, वसंत इरते, मथुरा भगत, रोहिणी चव्हाण, लता मेंगाळ, काळू निरगुडे आदींसह शेकडो कायकर्ते उपस्थित होते.

पुरवठा विभागावर कारवाई करा
पुरवठा विभागाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असून रेशनकार्ड असूनही ऑनलाइन एन्ट्री झाली नाही. त्यांना धान्य दिले नाही म्हणून पुरवठा अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांवर न्यायालयाचा अवमान केला म्हणून कारवाई करावी, अशी मागणी केली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news