नगर : माळीवाडा मारामारीतील नऊ आरोपींना अटक | पुढारी

नगर : माळीवाडा मारामारीतील नऊ आरोपींना अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा  : माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे दोन गटांत झालेल्या मारामारी प्रकरणातील नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, परस्परविरोधी फिर्यादींवरून सुमारे 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी (दि.24) रात्री लहान मुलांच्या वादातून दोन गटात मारामारी झाली होती. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.

याबाबत सुरेखा आदिनाथ लगड (रा.शेरकर गल्ली) यांच्या फिर्यादीवरून अबू सलीम इम्रान सय्यद, उजेस सय्यद, माजीद खान, आरबाज शेख, उमेर सय्यद, अबू सय्यद, फैज बागवान, ताहीर खान, साहील शफीक बागवान, ओजेर इसहाक सय्यद, माजीद मुर्तुजा शेख, जाफर रज्जाग बागवान व इतर 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिया ताहीर शेख (रा. पंचपिर चावडी) यांच्या फिर्यादीवरून धीरज परदेशी, सागर आहेर, ओंकार भागानगरे, शुभम कोमाकुल, ओंकार घोलप, यश घोरपडे, तेजय मराठे, तेजस नंदकुमार खाडे व इतर 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोणताही वाद झाल्यास आपसांत भांडण न करता पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

तीन दिवस पोलिस कोठडी
शुभम ऊर्फ परश्या नागेश कोमाकुल, साहील शफिक बागवान, ओंकार पांडुरंग भागानगरे, ओझेर इसहाक सय्यद, यश सुनील घोरपडे, माजिद मुर्तुजा शेख, तेजस ऊर्फ सोन्या चक्रधर मराठे, जाफर रज्जाक बागवान, तेजस नंदकुमार खाडे या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

चितळे रस्त्यावर दगडफेक
माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे सोमवारी सायंकाळी दोन गटांत झालेल्या मारामारीनंतर चितळे रोडवरही जमावाने दगडफेक केली. पंधरा ते वीस जणांच्या जमावाने चितळे रस्त्यावरील दुकानांवर दगडफेक केल्याने दुकाने बंद करण्यात आली होती. याबाबत शेख इजाज रेहमान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button