Stock Market Opening : सलग दुसऱ्या दिवशीही बाजार सपाट; बजाज ऑटो, सिप्लाचे शेअर्स घसरले | पुढारी

Stock Market Opening : सलग दुसऱ्या दिवशीही बाजार सपाट; बजाज ऑटो, सिप्लाचे शेअर्स घसरले

पुढारी ऑनलाइन डेस्क : Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराची आज सलग दुसऱ्या दिवशीही सपाट सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या सत्रात निफ्टी 17750 च्या वर गेला आहे. सेन्सेक्स सपाट उघडला असून फक्त 20 अंकांवर स्थिर आहे. बँक निफ्टी 42550 च्या खाली घसरला आहे. त्यामुळे आजच्या भारतीय बाजारात वेगवेगळे ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता दिसत आहे.तर बजाज ऑटोचे शेअर्स आज 1.41 टक्के घसरले आहे. जाणून घ्या आजची मार्केटची परिस्थिती…

देशांतर्गत निर्देशांकाची बुधवारी सुरुवात स्थिरपणे झाली. NSE निफ्टी 50 2.8 अंक किंवा 0.02% वाढून 17,772.05 वर आणि BSE सेन्सेक्स 32.83 अंक किंवा 0.05% घसरून 60,097.88 वर पोहोचला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, बँक निफ्टी 134.55 अंक किंवा 0.32% घसरून 42,543.95 वर आणि निफ्टी आयटी 64.65 अंक किंवा 0.24% वाढून 27,050.45 वर पोहोचला.

Stock Market Opening : सकाळच्या सत्रातील टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स

आयशर मोटर्स, टीसीएस, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प आणि लार्सन अँड टुब्रो हे टॉप गेनर्स होते तर हिंदाल्को, बजाज ऑटो, टाटा कंझ्युमर, अदानी पोर्ट्स आणि जेएसडब्ल्यू स्टील हे टॉप लूजर्स होते.

Stock Market Opening : बजाज ऑटो, सिप्ला, टाटा कन्ज्यूमर प्रोडक्ट्सचे समभाग घसरले

बजाज ऑटोचे चौथ्या तिमाहितील अहवाल सादर झाला आहे. चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 2.5% घसरून 1433 कोटी इतका झाला. त्यानंतर बजाज ऑटोच्या आज 1.41% घसरून रु. 4,281 वर आली आहे. विश्लेषकांनी आणखी मोठ्या घसरणीचा अंदाज व्यक्त केला होता. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल रु. 8904.7 कोटी होता, जो वर्षभरात 12% अधिक आहे, देशांतर्गत व्यवसायाच्या निरंतर गतीमुळे मजबूत व्हॉल्यूम-नेतृत्वात महसूल वाढ झाली. बजाज ऑटोचे शेअर्स गेल्या एका महिन्यात जवळपास 13% आणि गेल्या एका वर्षात 11% वाढले आहेत.

सिप्ला कंपनीने 28 एप्रिलपासून त्याची उपकंपनी मॅडिसन फार्मास्युटिकल्स विसर्जित केली जाईल असे सांगितल्यानंतर सिप्ला शेअर्स 0.31% घसरून 908.1 रुपयांवर आले. मॅडिसन ही एक निष्क्रिय संस्था आहे, तिचे विघटन कंपनीच्या कामगिरीवर किंवा कमाईवर परिणाम करणार नाही, असे सिप्ला म्हणाले.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे शेअर्स किरकोळ घसरले आहे. कंपनीने मार्च तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 23.5% वाढून रु. 269 कोटींवर गेल्याचे सांगितल्यानंतर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे समभाग 0.13% घसरून 733.35 रुपये झाले.

हे ही वाचा :

Bomb Threat By E-mail: दिल्लीतील शाळेला पुन्हा ‘ई-मेल’ द्वारे बॉम्बची धमकी

Shares Market Opening Bell : शेअर बाजार सपाट; जाणून घ्या मार्केटचा आजचा मूड

Back to top button