Dhule Crime : दुचाकींची चोरी करणारी टोळी गजाआड | पुढारी

Dhule Crime : दुचाकींची चोरी करणारी टोळी गजाआड

धुळे : दुचाकीची चोरी करणारी टोळी गजाआड

धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबार व मध्य प्रदेशातील सेंधवा येथुन दुचाकींची चोरी करणा-या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले. (Dhule Crime) चौघांकडून आठ दुचाकी जप्त करण्‍यात आल्‍या आहेत. आणखी काही गुन्हे उघडकीस येतील, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी व्यक्त केली .

धुळे जिल्ह्यात दुचाकी चोरीच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली हाेती. ( Dhule Crime) या गुन्ह्यांची उकल करण्याची सूचना पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी एका पथकाच्या मदतीने तपास सुरु केला. या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील व योगेश राऊत यांनी चौकशी केली. शिरपूर तालुक्यातील पिळोदे येथील गोपाळ भाईदास शिरसाठ याला संशयातून ताब्यात घेण्‍यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने शिरपूर तालुक्यातील होळनांथे व अन्य भागात चोरीच्या दुचाकींची  विक्री केल्याची माहिती समाेर आली.

शिरसाठ याने शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील राकेश संजय कोळी, आमोदे येथील गणेश सीताराम पवार व राजा कपुरदास बैरागी या तिघांच्या मदतीने आझादनगर, साक्री, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तसेच मध्य प्रदेशातील सेंधवा येथून दुचाकींची चोरी केल्याची बाब तपासात पुढे आली. पाेलिसांनी या चौघांकडून २ लाख ४० हजार रुपये किमतीच्य़ा ८ दुचाकी जप्त केल्या आहेत.

 

हेही वाचलं का ? 

Back to top button