Beed Crime : पोलीस असल्याचे भासवून गेवराईतील व्यापाऱ्याला फसवले - पुढारी

Beed Crime : पोलीस असल्याचे भासवून गेवराईतील व्यापाऱ्याला फसवले

गेवराई; पुढारी वृत्तसेवा :

पोलीस असल्याचे भासवून  एका व्यापाऱ्याकडील अडीच ताेळे साेन्‍यासह  राेकड भामट्यांनी लांबवली . (Beed Crime) मोंढा मार्केट गेवराई येथे  दि. १२ रोजी भरदिवसा हा प्रकार घडला.  हनुमान मशनरीसमोरील सीसीटीव्हीत संशयित आराेपी कैद झाले आहेत. याप्रकरणी गंगाभिषण बिहारीलाल भुतडा (वय ५९ रा. महेश कॉलनी, गेवराई) यांनी पोलीसांना फिर्याद दिली आहे.

(Beed Crime) पाठलाग करुन थांबवले

भुतडा यांचे श्रीनिवास भुसार (कडधान्याचे) मालाचे दुकान मोंढा भागात आहे. दि. १२ रोजी दुपारी साडेतीन वाजता ते दुचाकीवरून घरी जात हाेते. पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या दाेघा अनोळखी व्‍यक्‍तींनी आवाज देऊन त्‍यांना थांबवले. ‘आम्ही तुम्हाला दोनदा आवाज दिला तुम्ही थांबले नाहीत. आम्ही क्राईम ब्रॅचचे पोलीस असून तुम्हाला साहेबांनी बोलवले आहे. आम्ही रात्री ५ते६ लाखांचा गांजा पकडला आहे. त्याची चौकशी तुमच्याकडे करायची आहे’,  असे दुचाकीवरुन आलेल्‍या दाेघांनी सांगितले.

‘शाहू महाराजांच्या परिवर्तनवादी विचारांत सामाजिक समतेची जाणीव’

तुमच्या खिशातील हातरुमाल काढा. तुमच्या जवळ जे आहे ते यात ठेवा. असे त्यांनी सांगितले. भुतडा यांनी  २ तोळ्याची सोन्याची चेन व ५ ग्रॅमची अंगठी आणि मोबाईल फाेन रुमालात टाकला. दाेघांनी रुमालातील सोने व नगदी रक्कम काढून घेतली तर भुतडा यांना मोबाईल परत केला. काही कळण्याआधीच दोघे पसार झाले. या घटनेत असा एकूण नव्वद हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्‍याचे फिर्यादीमध्‍ये म्‍हटले आहे.

संशयित सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

गंगाभूषण भुतडा यांनी दिलेल्‍या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तीविरुध कलम ४१९, ४२०, १७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुतडा यांना लुबाडणारे चाेरटे परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. तपास गेवराई पोलीस ठाण्यातील कॉ. तुकाराम बोडखे करत आहेत.

हेही वाचलं का ?

Back to top button