‘आरटीपीसीआर’ सक्ती हटवण्याची केली शिफारस : जिल्हाधिकारी हिरेमठ | पुढारी

'आरटीपीसीआर' सक्ती हटवण्याची केली शिफारस : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव / निपाणी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे अद्यापही ‘आरटीपीसीआर’ची ( RTPCR )  सक्ती कायम असून, अन्य राज्यांतील प्रवाशांना कर्नाटकात ‘आरटीपीसीआर’ प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश नाही. आरटीपीसीआर सक्ती हटवण्यात यावी, अशी शिफारस आम्ही शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दै. पुढारी’ शी बोलताना दिली.

मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविलेल्या स[मा तपासणी नाक्यावरील सद्य परिस्थितीच्या दुसऱ्या पानाची प्रत व्हायरल झाली होती. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर ते व्हायरल करून अफवा पसरवली. याबाबत आज जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यामधील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सध्या कमी झाला आहे. यामुळे सीमेवरील तपासणी नाके आरटीपीसीआरची सक्ती बंद करावी, अशी शिफारस आम्ही शासनाकडे केली आहे. जिल्ह्यामधील कोरना पॉझिटिव्ह रेट कमी झाला असला तरी महाराष्ट्रातील पॉझिटिव्ह रेट पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत शासन निर्णय घेणार आहे. सध्या तरी नाक्यावरील आरटीपीसीआर तपासणीची सक्ती कायम असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Beed Crime : पोलीस असल्याचे भासवून गेवराईतील व्यापाऱ्याला फसवले

 ( RTPCR )  तपासणी नाक्यांवरील ‘आरटीपीसीआर’ प्रमाणपत्र सक्ती कायम

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ११ सीमावर्ती भागामध्ये तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी आरटीपीसीआर तपासणीशिवाय प्रवेश दिला जात नाही. याबाबत निपाणीचे सीपीआय शिवयोगी यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले की, अन्य राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये,आरटीपीसीआर प्रमाणपत्रविना कर्नाटक राज्यात कोणीही प्रवेश करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का?

Back to top button