Dhule ZP: पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक आठ जागा!

Dhule ZP: पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक आठ जागा!
Published on
Updated on

धुळे जिल्हा परीषदेच्या ( Dhule ZP ) पोटनिवडणुकीत जिल्हयात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक आठ जागा मिळवल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने 3, तर काँग्रेस व शिवसेनेने प्रत्येकी दोन जागा मिळवल्या आहेत. यात भाजपाचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांच्या पत्नीला पराभवाचा तडाखा बसला आहे. पंचायत समितीत शिरपुर तालुक्यातील सर्व आठ जागा भाजपाने राखल्या असुन जिल्हयात भाजपाने 15 गणांत आपले वर्चस्व राखले आहे. त्या पाठोपाठ काँग्रेसने पाच , राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रतयेकी तीन तर अपक्षांनी चार जागांवर यश मिळवले आहे.

धुळे जिल्हा परीषदेच्या ( Dhule ZP ) 15 जागांवर ओबीसी आरक्षणाच्या मुददयावरुन गंडांतर आले होते. यात भाजपाचे 12 , शिवसेनेचे दोन तर काँग्रेसच्या एका सदस्याचे पद रद झाले होते. या जागांवर पोटनिवडणुक घेण्यात आली. यात 62.59 टक्के मतदान झाले. आज सकाळी दहा वाजेला 20 टेबलांवर मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. यात लामकानी गटातुन भाजपाच्या धरती निखील देवरे यांनी शिवसेनेचे उमेदवार मिनाताई देवरे यांचा 4 हजार 296 मतांच्या फरकाने पराभव केला. त्यांना 8 हजार 690 मते मिळवली आहेत. भारतीय जनता पार्टीचे गुजराथचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. या पोटनिवडणुकीत सर्वाधिक मते मिळवून त्यांनी विजय मिळवला आहे. कापडणे गटातून जिल्हा परीषदेचे माजी सभापती रामकृष्ण खलाणे यांना मतदारांनी धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीचे माजी सदस्य तथा राज्याचे मंत्री अजीत पवार यांचे निकटवर्ती समजले जाणारे किरण पाटील यांनी त्यांचा 1263 मतांनी पराभव केला. तर मुकटी गटातुन राष्ट्रवादीच्या मिनल किरण पाटील यांनी भाजपाच्या कल्पना रोहीदास पाटील यांचा 602 मतांनी पराभव केला. विजयी झालेल्या मिनल पाटील या कापडणे गटातुन विजयी झालेले किरण पाटील यांच्या पत्नी आहेत.फागणे गटातुन भाजपाच्या आश्विनी भटुन-पाटील यांनी काँग्रेसच्या नयना रामचंद्र पाटील यांचा 1 हजार 85 मतांच्या फरकाने पराभव केला. नगाव गटातून माजी आमदार द. वा. पाटील यांचे नातू राघवेंद्र पाटील यांनी भाजपाच्या उमेदवारीवर सागर ज्ञानेश्वर पाटील यांचा 2 हजार 424 मतांनी पराभव केला.

कुसुंबा गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांचा अवघ्या 122 मतांनी पराभव झाला. त्यांना भाजपाचे संग्राम पाटील यांनी 5 हजार 934 मते घेत पराभव केला. विशेष म्हणजे या गटात नोटाला 124 मते असून नोटानेच शिंदे यांचा खरा पराभव केल्याची प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली आहे. नेर गटातून काँग्रसेचे आनंदा पाटील यांनी भाजपाचे संजय माळी यांचा चार हजार मतांनी पराभव केला.बोरविहीर गटात काँग्रेसच्या मोतनबाई पाटील यांनी आश्विनी पवार यांचा 2 हजार 52 मतांच्या फरकाने धूळ चारली. शिरुड गटातून भाजपाचे आशुतोष पाटील यांनी काँग्रेसचे बापुराव पाटील यांचा 521 मतांच्या फरकाने पराभव केला. तर रतनपुरा गट शिवसेनेने राखला. अनिताबाई प्रभाकर पाटील यांनी अपक्ष हर्षदा पाटील यांचा पराभव केला. या गटात भाजपाचा उमेदवार तिस-या क्रमांकावर होता. यापुर्वी माघारी अंती बोरकुंड गटातून शिवसेनेच्या शालिनी बाळासाहेब भदाणे या बिनविरोध झाल्या आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील चार गटांपैकी तीन गटांमध्ये भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून एका जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवाराने यश मिळवले आहे. यात भाजपाने मालपुरमधुन महावीरसिंह रावळ, नरडाणामधून संजिवनी सिसोदे, खलाणे गटातून सोनी कदम तर राष्ट्रवादीचे ललीत वारुडे यांनी बेटावर गटातून विजय मिळवला आहे.

शिरपुर पंचायत समितीमध्ये आमदार अमरीशभाई पटेल यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे. या तालुक्यात सर्व आठ जागा भाजपाने राखल्या आहेत. माघारी अंती विखरण गणातून विनीताबाई पाटील व करवंद गणातून यतीश सोनवणे हे बिनविरोध झाले आहेत. तर मतमोजणीअंती अर्थे खुर्द गणात संगीता पाटील, त-हाडी गणातून प्रतिभा भामरे, वनावल गणातून ममता चौधरी, जातोड गणातून विठाबाई पाटील, शिंगावे गणातून चंद्रकांत पाटील तर अजनाड गणातुन रेखाबाई जाधव हे विजयी झाले आहेत.

साक्री तालुक्यातील पंचायत समितीमध्ये शिवसेनेने व अपक्षांनी प्रत्येकी तीन जागा तर भाजपाने दोन व राष्ट्रवादीने एका जागेवर यश मिळवले आहे. यात कासारे गणातुन शिवसेनेचे माधुरी देसले, बळसाणेमधुन महाविर जैन,  म्हसदी प्र नेरमधून अर्चना देसले विजयी झाले, तर अपक्षांनी दुसाने गणातून रविंद्र खैरनार, चिकसे मधून रोशनी पगारे, जैताणेमधून सोनाली पगारे विजयी झाले. घाणेगाव गणातून भाजपचे रोहीदास महाले व पिंपळनेर गणातून भाजपाचे देवेंद्र गांगुर्डे विजयी झाले असून राष्ट्रवादीने मंगलाबाई भामरे यांनी धाडणे गणातून विजय मिळवला आहे.

धुळे तालुक्यातील पंचायत समितीमध्ये काँग्रेसने सर्वाधिक 5 जागा जिंकल्या. तर भाजप, राष्ट्रवादी व अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. धुळे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 30 जागांपैकी भाजपाने सर्वाधिक 15, काँग्रेसने 5, राष्ट्रवादीने 3, शिवसेनेने 3, व अपक्षांनी 4 जागा मिळवल्या आहेत. या यशात शिरपूर तालुक्यातील सर्वाधिक आठ जागांचा भाजपाला फायदा झाला आहे. शिंदखेडा तालुक्यातील पंचायत समितीच्या चार जागा भाजपाने मिळवल्या असून एक जागा राष्ट्रवादीने राखली आहे. यात दाऊळ गणातून भाजपाच्या वंदना ईशी, मेथी गणातुन रणजीत गिरासे, वर्शी गणातून अनिता पवार तर हतनुर गणातून पंडीत बोरसे विजयी झाले असून राष्ट्रवादीचे भाग्यश्री पाटील या खर्दे गणातुन विजयी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news