Monsoon : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता | पुढारी

Monsoon : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आजपासून मान्सून (Monsoon) परतीच्या वाटेला लागण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूसच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

परतीच्या पाऊस (Monsoon) हा राजस्थानपासून सुरू होईल, असंही सांगण्यात आलं आहे. बुधवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

७ आणि ८ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ९ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाड्यात पुन्हा तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

पुढील चार-पाच दिवस राज्याच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. असे वातावरण दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री निर्माण होईल. नागरिकांना खबरदारी घ्यावी, अशी माहिती हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंत होसाळीकर यांनी दिली.

हेही वाचा…

Back to top button