Nashik : सेवानिवृत्तीला २५ दिवस बाकी असताना जवानाचा अपघातात मृत्यू | पुढारी

Nashik : सेवानिवृत्तीला २५ दिवस बाकी असताना जवानाचा अपघातात मृत्यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा

Nashik : सेवानिवृत्तीला २५ दिवस बाकी असताना जम्मू काश्मीर येथे देशसेवा करणारे जवान गणेश सोनवणे यांचे अपघाती निधन झाले. ते मुळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील व सध्या नाशिक ( Nashik ) सिडको परिसरातील अंबड गावानजीक असलेल्या कंफर्ट झोन सोसायटीतील रहिवासी आहेत. जवान गणेश सोनवणे यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जवान गणेश सोनवणे हे सैन्यदलामध्ये कार्यरत होते. काल (दि. 5) सैन्यदलाच्या कार्यालयातून त्यांच्या पत्नीला फोन आला की, आपले पती एका अपघातात शहीद झाले आहेत. या घटनेने संपूर्ण सोनवणे कुटुंबीय हादरले. सोनवणे कुटुंबीयांचे दुर्दैव असे की गणेश सोनवणे यांच्या दोन्ही भावांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आणि काल गणेश हे देशसेवा करीत असताना शहीद झाले.

गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (दि. ६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंबड येथील निवासस्थानी येणार असून त्यांचा अंत्यविधी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे होणार आहे.

गणेश सोनवणे यांचा कुटुंबियांसोबतचा अखेरचा संवाद… ( Nashik )

मी 30 ऑक्टोबरला सेवा निवृत्त होत आहे, त्यानंतर बेटा आपण सर्वजण सोबतच राहू आणि हो माझ्या साहेबांनी आणि माझ्या सोबती असलेल्या सर्व मित्रांनी मला एक चार चाकी गाडी गिफ्ट दिली आहे!!!! आपण खूपच मज्जा करू बेटा !!! असे आपल्या मुलीला सांगत जम्मू कश्मीर या ठिकाणी सैन्यदलात देशसेवेत कार्यरत असलेल्या गणेश सोनवणे यांनी आपला फोन ठेवला, अन नंतर सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या पतीचे निधन झाले आहे, एका अपघातात ?? अशी दुर्दैवी घटना घडली आहे.

अधिक वाचा :

Back to top button