'लासलगाव का प्याज' चे टपाल विभागाकडून ब्रॅण्डिंग | पुढारी

'लासलगाव का प्याज' चे टपाल विभागाकडून ब्रॅण्डिंग

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा : कांद्याचं नाव काढलं की संपूर्ण देशाचे लक्ष लागते ते लासलगावकडे. आपल्या उत्कृष्ठ चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या कांद्याचं टपाल विभागाकडून ब्रॅण्डिंग करण्यात आलं आहे. ‘लासलगाव का प्याज’ या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले. पोस्ट ऑफिसच्या लिफाप्यावर कांदा झळकला असल्याने लासलगावच्या नावलौकिकात भर पडली आहे.

या अनावर प्रसंगी लासलगावचे सरपंच तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, मालेगाव पोस्ट विभागाचे अधीक्षक नितीन येवला, चांदवडचे डाक निरीक्षक आर. एन. वानखेडे, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, नंदकुमार डागा, राहुल पाटील, कांदा व्यापारी ओमप्रकाश राका, लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल वाघ यांच्या उपस्थित करण्यात आला.

वारसा जतन करण्यासाठी केले टपालाचे अनावरण

लासलगावचा कांदा ओळख असलेल्या कांद्याला २०१६ भौगोलिक मानांकन प्राप्त झाले होते. यामुळे लासलगावच्या कांद्याला ऐतिहासिक आणि पारंपरिक मूल्ये प्राप्त व्हावे, येथील कांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि वारसा म्हणून जतन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने ‘लासलगाव का प्याज’ या विशेष पाकिटाचे अनावरण केले.

आशिया खंडात चवीने प्रसिद्ध असलेला लासलगावच्या कांद्याने भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तर भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा दिल्लीतील सरकार उलथण्याची ताकद याच्यांमध्ये आहे, असा हा कांदा आता पोस्ट विभागाच्या मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेणार आहे.

केंद्र व राज्य सरकार, कृषी विभाग आणि टपाल खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जीआय नामांकन प्राप्त शेतमालाला पोस्ट पॉकिटवर स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लासलगाव पोस्ट कार्यालयात करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ :  ही गोष्ट चिमुरड्याच्या माध्यमातून भक्तीची नवी भाषा शिकवते

Back to top button