

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: Jalgaon Crime : रावेर तालुक्यातील पाल येथे मध्यप्रदेशातील एका गावात राहणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalgaon Crime या घटनेतील तरूणाचे गुलाम रसुल नवाज तडवी (वय २५) असे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल येथील गुलाम तडवी याची ओळख मध्य प्रदेशातील एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणीसोबत ओळख झाली. त्यानंतर मोबाईलवरून ते दोघेजण एकमेकांशी संपर्कात आले. या ओळखीचे रूपांर प्रेमात झाले.
यामुळे तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला २ जून २०२१ रोजी भेटण्यासाठी रावेर येथे बोलाविले. यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवीने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या राहत्या घरी नेले. तेथे तिला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला.
यानंतर गुलामने ही गोष्ट घरच्यांना सांगितलीस तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पुन्हा ९ सप्टेंबर रोजी देखील पिडीत तरूणीवर त्याने अत्याचार केला.
याप्रकरणी पिडीत तरूणीने मध्य प्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात गुलाम विरोधात तक्रार देवून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हा हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
अद्याप संशयित आरोपीला अटक केलेली नाही. पुढील तपास डीवायएसी विवेक लावंड करीत आहे.
हेही वाचलंत का?