कोल्हापूर : वीज कनेक्शन तोडले म्हणून तरुणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

कोल्हापूर : वीज कनेक्शन तोडले म्हणून तरुणाकडून आत्मदहनाचा प्रयत्न

रुकडी; पुढारी वृत्तसेवा : माणगाव ता. हातकणंगले येथील महावितरणने कोणतीही पूर्व कल्पना व नोटीस न देता घरातील वीज कनेक्शन बंद केल्याने येथील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संतोष राजमाने याने आज दुपारच्या सुमारास महावितरण उपकेंद्राच्या दारातच स्वतः वर पेट्रोल ओतून घेवून आत्मदहन करणेचा प्रयत्न केला.

माणगावमध्ये याबत तात्काळ महावितरण उपकेंद्र येथून सदर घटनेची कल्पना ग्रामपंचायतीला देणेत आली. ग्रा.पं. चे सर्व पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी राजमाने याच्या हातातील काडी पेटी काढून घेऊन त्याच्या अंगावर पाणी ओतले.

त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. माणगाव वीज केंद्र परिसरात कांही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी या ठिकाणी गर्दी केली होती.

हेही वाचलत का :

अभिनेत्री प्रार्थना बेहरे बनवतेय गणपती स्पेशल गाजराची खीर

Back to top button