नाशिक : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापिठ सिनेट निवडणूक; सिडकोत हिरे व बडगुजर आमने सामने | पुढारी

नाशिक : पुणे सावित्रीबाई फुले विद्यापिठ सिनेट निवडणूक; सिडकोत हिरे व बडगुजर आमने सामने

सिडको : पुढारी वृत्तसेवा

कोणतीही निवडणुक असो नाशिकपेक्षा सिडकोमध्ये प्रथम निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे चित्र आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत सिडकोत शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे एकमेकांविरोधात आल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२२ची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत अभाविप विद्यापीठ विकास मंचच्या माध्यमातून सिनेट निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ प्रगती पॅनल आहे. यात विकास मंच व प्रगती पॅनल यांच्यात लढत आहे. या निवडणुकीचे सिडकोतील उत्तमनगर येथील वावरे महाविद्यालयात मतदान केंद्र असून या केंद्राबाहेर प्रगती पॅनल व विकास मंच यांच्यात लढत सुर आहे. उत्तमनगर येथील मतदान केंद्राबाहेर महाविकास आघाडीच्या प्रगती पॅनलचे नेतृत्व शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर करत आहेत. तर अभाविप विद्यापीठ विकास मंचच्या पॅनलला माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी पांठिबा दिला आहे. सिडकोतील उत्तमनगर येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे हे ऐकमेकांसमोर आल्याने परिसरातील वातावरण तापले आहे तर दुसरीकडे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे.

हेही वाचा:

Back to top button