नाशिक : गोदावरीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. पुलकुंडवार

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,WWW.PUDHARI.NEWS
आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,WWW.PUDHARI.NEWS
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माझे मूळ गाव नांदेड आणि नियुक्तीचे ठिकाण नाशिक या दोन्ही शहरांना गोदावरीचा आशीर्वाद लाभला आहे. त्यामुळे शहर विकासाचे व्हिजन समोर ठेवताना गोदावरी नदीचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासही माझे प्राधान्य असेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. सी. एल. पुलकुंडवार यांनी केले.

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवि महाजन, राष्ट्रीय उपाध्यक्ष अनंत राजेगावकर, राष्ट्रीय घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर, क्रेडाईचे सुनील कोतवाल, उपाध्यक्ष कृणाल पाटील, मानद सचिव गौरव ठक्कर, माजी अध्यक्ष नेमीचंद पोतदार, सुरेश पाटील, उमेश वानखेडे उपस्थित होते. आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले की, साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर नमामि गोदा प्रकल्प राबवून गोदावरी नदी व काठ स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

शहरातील रस्ते कसे टिकतील, याकरिता काँक्रिटीकरणासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणार. पुढील 50 वर्षांपर्यंत शहराला पाण्याची चिंता नसली, तरी वितरण व्यवस्थेत सुसूत्रता आणणार. जलशुद्धीकरण प्रकल्पात अपग्रेड करणार. पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच अतिक्रमणावर कठोर कारवाई करणार. नाशिकबाहेर रिंग रोडसाठी भूमी अधिग्रहणासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरू असून, शहराचे संचलन सुरळीत होण्यासाठी भविष्यातील रिंग रोडची गरज ओळखून त्याबाबतचे नियोजन करणार. प्रस्तावित निओ मेट्रो, सेमी स्पीड रेल्वे, आयटी, लॉजिस्टिक पार्क प्रकल्प लवकरच पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनपाच्या नगर रचना विभागाचे सुसूत्रीकरण करण्याबरोबरच 24 तासांत बांधकाम परवानगी मिळावी, सोबतच असेसमेंट व त्वरित पाण्याची जोडणी मिळावी, यावरदेखील भर देणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, याप्रसंगी क्रेडाईच्या पदाधिकार्‍यांकडून शहर विकासासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, यावर भर देण्याची गरज असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news