कोल्हापूर : दानोळीत जागर स्वावलंबी शिक्षणाचा उपक्रम उत्साहात | पुढारी

कोल्हापूर : दानोळीत जागर स्वावलंबी शिक्षणाचा उपक्रम उत्साहात

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : येथे दैनिक पुढारी आयोजित ‘जागर स्वावलंबी शिक्षणाचा’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यामंदिर पश्चिम शाळेच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन दै. पुढारीच्या अंकाचे वितरण केले. यावेळी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्याध्यापिका शोभा चंदोबा यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा स्वावलंबी शिक्षणाचा वसा व वारसा जोपासणे गरजेचे असल्याचे सांगितले. कुमार विद्या मंदिर शाळा नं-2 मध्ये सामूहिक वाचन घेण्यात आले. गावातील कुमार वि. मं. शाळा नं-१, कन्या वि.मंदिर, पुर्व मळा शाळा, जीवन शिक्षण विद्या मंदिर, आदर्शगाव आणि दानोळी हायस्कूल, दानोळी येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त दैनिक पुढारीचे वाचन करण्यात आले. वृत्तपत्र विक्रेते शितल पिसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक विजय भोसले यांनी केले.

हेही वाचा :

Back to top button