Nashik Crime : अवघ्या अडीच तासांत पावणेचार लाखांची चोरी

Nashik Crime : अवघ्या अडीच तासांत पावणेचार लाखांची चोरी

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
दुपारी फक्त अडीच तासांसाठी घराबाहेर पडलेल्या दत्तू रामचंद्र साबळे यांच्या घरात चोरट्यांची धाडसी चोरी केली. कपाटातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह एकूण 3 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. शहरातील नामपूररोडलगतच्या श्रीकृष्णनगरमध्ये रविवारी (दि. 26) ही घटना घडली.

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला असलेले साबळे (50) हे रविवारी घराला कुलूप लावून परिवाराला घेऊन शेतात गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी भर दिवसा काही मिनिटांत घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात असलेल्या 3 लाख 42 हजार 500 रुपयांचे सोन्या व चांदीचे दागिने तसेच 28 हजार रोख असा एकूण 3 लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. भरदिवसाही चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत साबळे यांनी सटाणा ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव अधिक तपास करीत आहेत. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी घटनास्थळास भेट देऊन घटनेची पाहणी केली.

घरफोड्यांचे सत्र
मालेगाव शहर, परिसरात चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरू आहे. गत आठवड्यात सोयगावमधील दुसाने ज्वेलर्स या सराफपेढीत तब्बल 21.75 लाखांची चोरी झाली होती. या परिसरात चोर्‍यांची मालिका सुरू असली, तरी एकाही गुन्ह्याची उकल झालेली नाही, हे विशेष.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news