नाशिक : पुढारी ऑनलाइन
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्ह्यात आता शिंदे यांचे समर्थन करणारे बॅनर समर्थकांकडून लावले जात आहेत. या पोस्टरवर हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या छायाचित्रासह एकनाथ शिंदे यांचे समर्थन दाखवणारा आशय लिहला आहे. अगदी नाशिकमध्येही आता या बंडानंतर पडसाद उमटताना दिसून येत आहे.
नाशिकमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणा-या बॅनरवर काळे फासल्याने परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. एकनाथ शिंदे हाय हाय…अशा घोषणा देत शिवसैनिक आक्रमक झाले होते. महानगर संघटक राहुल दराडे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार, उमेश चव्हाण, अमोल सूर्यवंशी, सचिन बांडे, वैभव ठाकरे, शोभा मगर आदी शिवसैनिकांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा निषेध केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी घोषणा दिल्या.