जालना : सापडलेला मोबाईल केला परत | पुढारी

जालना : सापडलेला मोबाईल केला परत

परतूर, पुढारी वृत्तसेवा ः शाळा सुटल्यानंतर घराकडे जाणार्‍या विद्यार्थ्याना सापडलेला मोबाइल शाळेच्या शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थ्याले पोलिसांच्या स्वाधीन केला. वाटुर फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्याच्या प्रमाणिकपणाचे कौतुक होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन पिंपरखेडा (गरड) 22 जून रोजी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घराकडे निघाले असता शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी अनिकेत पजई व इयत्ता सहावीचा विद्यार्थी करण राऊत या विद्यार्थ्याच्या नजरेस रस्त्याच्या कडेला पडलेला मोबाईलवर दिसला. मोबाईल न उचलता विद्यार्थ्याने शिक्षक सिरसाट व काळे य यांना मोबाईलची माहिती दिली. शिक्षकांनी तो मोबाईल घेऊन येण्यास विद्यार्थ्याना सांगितले. मोबाइल शिक्षकांनी हातात घेऊन पाहिला असता. तो किंमती मोबाइल पाण्याने भिजलेला होता. त्या मोबाईलच्या कव्हरमध्ये पंधराशे रुपये रोख होते.

शिक्षकांनी मोबाईल वाटूर येथील पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी राम पालवे यांच्याकडे जमा केला. प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक व्हि. व्हि. खरात, शिक्षक सिरसाट व काळे, रवी जयस्वाल, पालक सचिन वाघमारे शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थी यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बक्षीस

पोलिस चौकीतील पोलिसांनी विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा पाहून दोन्ही मुलांना प्रत्येकी दोनशे रुपये बक्षीस दिले.

हेही वाचलंत का? 

Back to top button