धरणगाव दिंडीला नगरजवळ अपघात अज्ञात वाहनाची जेऊर शिवारात धडक

धरणगाव दिंडीला नगरजवळ अपघात अज्ञात वाहनाची जेऊर शिवारात धडक
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात पायी जाणार्‍या दिंडीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पाच महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. रत्नाबाई सुधाकर पाटील ( वय 60 रा. घोरगाव जि. जळगाव), भिकुबाई भगवतीराव पाटील (वय 68 रा. साखरखेडा ता. अमळनेर जि. जळगाव), निर्मला लक्ष्मण सपकाळ (वय 62 रा. साखरखेडा) कल्पना विजय कोळी (वय 50 रा. साखरखेडा), मलताबाई गोकुळ कोळी (वय 47 रा. साखरखेडा) अशी जखमी महिला वारकर्‍यांची नावे आहेत. जखमी महिलांवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील भगवान बाबा दिंडी पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात पाच महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. जेऊर शिवारातील जरे वस्तीजवळ ही घटना घडली. घटना घडल्यानंतर अपघात निश्चित कोणत्या गाडीने घडला याची माहिती समजली नाही. परंतु वारकर्‍यांनी बलेनो कारने महिला वारकर्‍यांना उडविले असल्याचे सांगितले. तर प्रत्यक्षदर्शी या वाहनाचा अपघातात संबंध नसल्याचे सांगत आहेत. यावेळी वारकर्‍यांकडून बलेनो चालकास मारहाण करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दिंडीतील वारकर्‍यांचा अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त जाती जमातीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय डोकडे तसेच जेऊर सरपंच राजश्री मगर यांचे पती अण्णासाहेब मगर यांनी जखमी महिलांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news