

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: धायरी येथील पारी रोडवरील पलीकडच्या कचरा विलगीकरण केंद्रात गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मात्र, नागरिक व अग्निशामक दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे आग लवकर आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. कचरा विलगीकरण केंद्रात सुमारे वीस ते पंचवीस टन कचरा साठला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कचरा हलविण्यात आलेला नाही. त्यामुळे मोठे ढिगारे साठले आहे.
दुपारी अचानक आग लागून धुराचे मोठे लोट परिसरात पसरले. धुराबरोबर आगीचा भडका उडाला. त्यामुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाडीसह जवान, सिंहगडरोड क्षेत्रीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली.
हेही वाचा