Nashik Crime : कोयतेधारी गँगचा नाशिकरोडला धुमाकूळ, डॉक्टरला केले जखमी | पुढारी

Nashik Crime : कोयतेधारी गँगचा नाशिकरोडला धुमाकूळ, डॉक्टरला केले जखमी

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
कोयतेधारी गँगची दहशत अद्यापही सुरूच असून, नाशिकरोड परिसरात दोन ठिकाणी कोयतेधारी गँगने धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

बिटको हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरवणार्‍या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत डॉ. ओंकार पाटील हे कार्यरत असून, बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास ते बिटको हॉस्पिटलसमोर मोबाइलवर बोलत होते. त्यावेळी दोन दुचाकीवरून चौघे आले व त्यांनी डॉ. पाटील यांना शिवीगाळ करून त्यांचा मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. पाटील यांनी विरोध करताच एकाने त्यांच्या हातावर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर इतर तिघांनी दमदाटी करून त्यांच्या खिशातील तीन हजार रुपयांची रोकड काढून पलायन केले. कोयत्याने हल्ला केल्यामुळे डॉ. जखमी झाले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता हल्लेखोर पसार झाले. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दुसर्‍या एका घटनेत जय भवानी रोडवर असलेल्या भालेराव मळा येथे तीन ते चार जणांच्या बुरखा परिधान केलेल्या टोळक्याने हातात तलवारी व कोयते घेऊन दीपक पाईकराव या युवकाच्या घरात घुसून हल्ला केला. त्यानंतर त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली. तसेच बाहेर असलेल्या दुचाकीची तोडफोड करून जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उपनगर पोलिस पुढील तपास करीत

हेही वाचा :

Back to top button