सोलापूर : कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन | पुढारी

सोलापूर : कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातून आरोपीचे पलायन

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

टॉयलेटचा बहाणा करून पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पोलिस ठाण्यातून पळून गेल्याची घटना माढा तालुक्यातील कुर्डुवाडीत आज गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल ज्ञानेश्वर मरगळ उर्फ माळी (वय २५)असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे, बुधवारी पोलिसात कलम ४०७ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता. गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात नेण्यात आले होते. त्याने टॉयलेट्सच्या  कठड्यावरून उडी मारुन पळुन गेला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सदर संशयित आरोपी राहुल मरगळ (माळी),  दशरथ मरगळ (माळी) व दत्ता मरगळ (माळी)  आपल्या कुटुंबासह कुर्डू (ता.माढा) येथील फिर्यादी  तुकाराम विष्णू पायगण यांच्या शेतात गेल्या दहा महिन्यापासून आठवडा पगारीवर कामाला होते. शेतातील खोल्यांध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती. रविवारी, दि.५ जून रोजी वरील सर्व आरोपी पायगण यांचा शेतातील शेती अवजारांसह पायगण यांचा  टमटम (एम एच ४५ टी २२७९ ) घेऊन  पळून गेले होते. याबाबत पायगण यांनी दि. ६ रोजी फिर्यादी दिली. या संशयित आरोपींना त्यांच्या पत्त्यावरुन नेवासे येथून बुधवार दि. ८ रोजी रात्री अटक करुन आणले होते.

आरोपीमधील राहुल मरगळ याने लघुशंकेचे कारण सांगून पोलिसांच्या हाती तुरी देत भिंतीवरून उडी मारून पळून गेला. पोलिस सदर आरोपीचा फोटो सर्व समाजमाध्यमावर टाकून तसेच ग्रामसुरक्षा यंत्रणेवरुन सदर आरोपी बद्दल माहिती प्रसारित केली. पोलिस सदर आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी पळून गेला आहे, मात्र आरोपी जवळ पैसे नसल्यामुळे तो कोणत्याही वाहनाने पळून जाऊ शकत नसल्याची शक्यता आहे. मात्र रेल्वेने पळून जाऊ शकतो.  आरोपीला शोधण्यासाठी सर्वत्र ठिकाणी पोलीस पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button