नाशिक : बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दुचाकींनी घेतला पेट | पुढारी

नाशिक : बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दुचाकींनी घेतला पेट

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या दोन दुचाकींनी पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि.13) शहरातील वृंदावन कॉलनीत घडली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. मात्र, तो पर्यंत दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या. आगीचे कारण अस्पष्ट असून, वाढत्या तापमानामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, समाजकंटकाने आग लावून पळ काढल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, शहरातील कॅम्प भागातील वृंदावन कॉलनीत रेल्वे कर्मचार्‍यांची कॉलनी असून, पार्किंगमध्ये रेल्वे कर्मचारी त्यांची दुचाकी उभी करून ठेवतात. दुपारी दोन दुचाकींनी अचानक पेट घेतला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुदैवाने आग बिल्डिंगच्या इतर भागात पसरली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचा :

Back to top button