राष्ट्रवादीच्या लोकसभा गटनेत्या सुप्रिया सुळे रविवारी नाशकात | पुढारी

राष्ट्रवादीच्या लोकसभा गटनेत्या सुप्रिया सुळे रविवारी नाशकात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

सुप्रिया सुळे या रविवारी नाशकात येत असून सकाळी ९.३० वाजता भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी १०.०० वाजता शहरातील चार्टड अकाऊंटट व संघटनेतील पदाधिकारी यांच्या सोबत सी.ए. भवन, अशोका शाळा येथे बैठक घेऊन संवाद साधणार आहे.

सकाळी ११.१५ वा गंगापूर रोड येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे यशस्विनी सामाजिक अभियानातील पदाधिकारी व महिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी ३.३० वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे साहित्य क्षेत्रातील व पत्रकारिता महिलांशी संवाद साधणार आहे. सायंकाळी ६ वाजता मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथील कर्ता शेतकरी प्रकल्पास भेट देणार आहे. अशी माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली

हेही वाचा :

Back to top button