

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथे गावठी कट्टे, काडतूसासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक येथे आलेख उंचावत चालला आहे. खून, प्राणघातक हल्ले आणि जबरी चोरीच्या घटना वाढत चालल्याने पोलिस अॅक्शन मोडवर आलेत.
अधिक वाचा –
सोमवारी (दि.2) मध्यरात्री केलेल्या कारवाईत पाच जणांना अवैध प्राणघातक अग्निशस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले.
त्यात तीन देशी बनावटीचे पिस्टल, सात जीवंत काडतूस याचा समावेश आहे.
अधिक वाचा –
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्या प्रवृत्तींविरोधात पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशान्वये पोलिस ठाणेनिहाय कारवाई सुरू झाली आहे.
शहरात काल मध्यरात्री नयापुरा व नुरबाग परिसरात छापेमारी करण्यात आली. संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
त्यात हफिजुर रेहमान मो. इद्रीस (रा. नयापुरा), इम्रानखान अताउल्लाखान उर्फ इम्रान शेट्टी (रा. दातारनगर), शेहजाद अख्तर मो. सिद्दीक, (रा. हजारखोली), हे समाविष्ट आहेत.
अधिक वाचा –
अब्दुल रेहमान शेख हसन (रा. कमालपुरा), अझरुद्दीन गयासुद्दीन सैय्यद (रा. आयशानगर) यांचाही समावेश आहे.
त्यांच्याकडून तीन गावठी कट्टे व सात जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. संबंधितांविरोधात आझादनगर व आयशानगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3 /25 सह भादंवि 353, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले.
अधिक वाचा –