नाशिक : आमदार मिटकरी यांच्या विरोधात पंचवटी पोलिसांत तक्रार अर्ज  | पुढारी

नाशिक : आमदार मिटकरी यांच्या विरोधात पंचवटी पोलिसांत तक्रार अर्ज 

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्मातील पवित्र विधींबाबत भाषणात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करीत नाशिकमधील पुरोहित संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम कोल्हे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.

तक्रार अर्जाव्दारे आ. मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुरोहित संघाव्दारे करण्यात आली. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतीक शुक्ल, वैभव दीक्षित, शेखर शुक्ल, बालाजी गायधनी, राहुल कुलकर्णी, राजाभाऊ गायधनी, राजन जोशी, गिरीश देशपांडे, अतुल गायधनी, संदीप ईंगे, ॲड. विजय धारणे, सुरेश शुक्ल, उपेंद्र देव, रवी देव, संकेत गायधनी, अमित पांचभैये, कल्पेश दीक्षित आदी उपस्थित होते.

हेही  वाचा:

Back to top button