

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवडचा प्रवास उद्योग नगरी, स्मार्ट सिटी असा होत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसराचा कायापालट झाला.तरीही स्मार्ट सिटी असणार्या पिंपरी चिंचवड परिसरात यात्रा, जत्रा, उत्सव, सण यांची परंपरा कायम राखली जात आहे.
पिंपळे गुरव, वाकड, भोसरी, हिंजवडी या गावांचे उत्सव नुकतेच संपले. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम, तमाशा, कुस्त्यांचा आखाडा यांनी उरुसामध्ये रंगत आणली. अनेक गावांचे एकत्रीकरण करून झालेल्या शहरात आजही ग्रामदेवतांच्या यात्रा भरत आहेत.
त्यामुळे खेड्याचा कसलाही संबंध नसलेल्या अनेकांना त्यानिमित्ताने यात्रा अनुभवायला मिळत आहेत. आयटी नागरी समजल्या जाणार्या हिंजवडीमध्ये बगाडाचे नियोजन करण्यात आले होते. तर पिंपरी चिंचवड शहरात कुस्त्यांच्या आखाड्यांनी रंगत आणली.
लोकनाट्य, चक्री भजन, ढोल ताश्यांचे खेळ, तमाशा, पालखी मिरवणूक या पारंपरीक कलागुणांना यंत्रांच्या सादरीकरण करता आले. गेली दोन वर्ष कोरोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले होते.
तर गेल्या काही वर्षांत शहरातील अनेक भागांचे रूप बदलून गेले आहे. गावपण बदलून त्याचे रूपांतर इमारतींमध्ये झाले आहे. अनेक परिसरांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनातून बदल होत गेले. मॉल्स, व्यावसायिक संकुल यांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे.
त्यामुळे यंत्रांच्या निमित्ताने गावाची परंपरा राखली गेली आहे. भोसरी ग्रामदैवत भैरवनाथ महाराज, वाकड हिंजवडीचे ग्रामदैवत म्हातोबा महाराज त्यांच्या पालखी आणि छबिना यामध्ये गावकर्यांची उत्सुकता दिसून आली.
https://youtu.be/wimwsVNgHnY