कार्ला : पर्यटकांना लुटणारे दोघे अटकेत

Carla: Two arrested for robbing tourists
Carla: Two arrested for robbing tourists
Published on
Updated on

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये टायगर पाईन्ट परिसरात फिरायला गेलेल्या युवकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या दोन चोरट्यांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली आहे. तसेच, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

सुनील लक्ष्मण आखाडे (वय 23, रा. घुसळखांब, आंबवणे) आणि चिंतन लक्ष्मण पाठारे (19, रा. ओळकाईवाडी, ता. मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतवन सहारा सिटीकडे जाणार्‍या रोडवर लादेन नबी अहंमद खान (रा . गोरखपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. लोणावळा) हे त्यांच्या मित्रासोबत गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी आरोपींनी त्यांना दमदाटी करून शस्त्रांच्या धाक दाखवत मारहाण केली. तसेच, त्यांच्याकडील दोन मोबाईल व सोन्याचा बदाम चोरून नेला.

या घटनेचा तपास करीत असताना लोणावळा ग्रामीण पोलिसांना वलवण, लोणावळा येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे दोनजण संशयीत फिरत असताना दिसून आले. चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, लोणावळा उप विभागाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन राऊळ, विलास गुजर,

कुतुबुद्दीन खान, युवराज बनसोडे, विजय गाले, किशोर पवार, प्रणय उकीरडे, ऋषिकेश पंचरास, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चौधरी, फौजदार प्रकाश वाघमारे, प्राण येवले यांनी ही कारवाई केली.

https://youtu.be/wimwsVNgHnY

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news