तळेगाव दाभाडे : ‘बेटी बचाओ’ चे शिल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत | पुढारी

तळेगाव दाभाडे : ‘बेटी बचाओ’ चे शिल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेले ‘बेटी बचाओ’ चे शिल्प लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नागरिकांनी या शिल्पाचे लोकार्पण करावे, अशी मागणी केली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता आल्हाटसह 7 जणांवर गुन्हा

येथील कडोलकर कॉलनीमध्ये नगरपालिकेच्या निधीतून 27 लाख खर्च करून ‘बेटी बचाओ शिल्प’ तयार केले आहे. या शिल्पाचे काम जानेवारी 2022 मध्ये सुरू केले आणि ते मार्च 22 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे.

मुंबई : उद्या सकाळी ९ वाजता मातोश्री समोर करणार हनुमान चालिसा पठण

या शिल्पाच्या भोवती हिरवळ, शिल्प ठेवण्यासाठी चबुतरा, रंगरंगोटी, बेटी बचाओचे शिल्प व नावाचा बोर्ड तयार करण्यात आला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी या शिल्पाच्या कामांमध्ये लक्ष घालून ते 3 महिन्यांमध्ये पूर्ण करून घेतले आहे.

कार्यकारी संचालकांच्या पॅनेलसाठी सहा सदस्यीय समिती

यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या तळेगावच्या इतिहासामध्ये भर पडणार आहे. परंतु, या शिल्पाचे अद्याप उद्घाटन करण्यात न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button