नाशिक : पाण्यासाठी लासलगाव शहर विकास समितीचे उपोषण | पुढारी

नाशिक : पाण्यासाठी लासलगाव शहर विकास समितीचे उपोषण

नाशिक (लासलगाव) पुढारी वृत्तसेवा

शहराला पाणीपुरवठा करणारी 16 गाव पाणी योजनेला ग्रहण लागल्याने लासलगाव शहराला पंधरा दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहे. राजकारणी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचा हा प्रकार चालू असल्याचा आरोप करीत  लासलगाव शहर विकास समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केले आहे.

सोळा गाव पाणीपुरवठा योजना अनेक कारणांमुळे बंद पडत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून प्रताप सागर येथून पाण्याची व्यवस्था सुरु करावी, पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत गावातील मोकळ्या जागेत बोरवेल करून पर्यायी व्यवस्था उभारावी अशा मागण्या लासलगाव शहर विकास समितीने केल्या आहेत. जोपर्यंत या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणास राजेंद्र कराड, संदीप उगले, बालेश जाधव, गणेश चांदोरे, हमीद शेख, चंद्रकांत नेटारे, बाळासाहेब सोनावणे, प्रमोद पाटील, महेंद्र हांडगे आदी सहभागी आहे.

हेही वाचा :

Back to top button