‘शेर शिवराज’चा मेटाव्हर्समध्ये ट्रेलर | पुढारी

‘शेर शिवराज’चा मेटाव्हर्समध्ये ट्रेलर

पुढारी ऑनलाईन

सध्या मराठी चित्रपट तंत्रज्ञानाच्या बाबतीतही अग्रेसर होऊ लागले आहेत. आता ‘शेर शिवराज’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्समध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मुव्ही स्टुडिओ आणि यूएफओ मुव्हीज यांच्याबरोबरच मेटावूडच्या सहकार्याने हा ट्रेलर मेटाव्हर्समध्ये रीलिज केला. गेल्या काही दिवसांपासून ‘मेटाव्हर्स’ या संकल्पनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका आभासी तंत्रज्ञानाद्वारे ओळख तयार करून त्याद्वारे संवाद साधण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिले जाते.

मनोरंजनाचा हा नवा ट्रेंड प्रत्येकाला आकर्षित करीत आहे. मेटाव्हर्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दाखविण्यात आलेला ‘शेर शिवराज’ हा पहिलाच मराठी चित्रपट ट्रेलर आहे. अफझल खानाच्या वधावर आधारित या चित्रपटात चिन्मय मांडलेकर शिवरायांच्या भूमिकेत असून बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे अफझल खानाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 22 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Back to top button