जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार ; इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख | पुढारी

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार ; इन्स्टाग्रामवर झाली होती ओळख

जळगाव पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेम बहरले. याच प्रेमप्रकरणातून जळगावातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवित नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महिने वेळावेळी शारिरीक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करणाऱ्या तरूणाला शहर पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, पिडीत तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २०२१ मध्ये तीची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश खान मुबारक खान (वय-१९) रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्यासोबत ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. यादरम्यान तरुणीचे तिच्या समाजाच्या तरुणासोबत लग्न ठरले. यादरम्यान दानिश याने तरुणीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवित दानिश याने वेळावेळी नागपूरातील लॉज, तसेच जळगावात तरुणीवर शारिरीक अत्याचार केले. ४ एप्रिल रोजी तरुणी जळगावात आली. दानिशच्या कुटुंबियांना भेटली. ७ एप्रिल पर्यंत ती जळगावात राहिली. त्यानंतर दानिशच्या मित्रांनी तिला  मलकापूर येथे एकटेच सोडले. तरुणी कशीतरी नागपूरातील तिच्या मावशीकडे पोहचली. यादरम्यान तरुणीने दानिशला फोन केले व घ्यायला यायला सांगितले. मात्र त्याने येण्यास नकार देत, उलट तरुणीला जळगावात बोलाविले.

तरुणी एकटीच जळगावात आली. यादरम्यान दानिशने त्याचा फोन बंद करुन ठेवला. फोन लागत नसल्याने तरुणी जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाजवळ पोहचली. दानिशसोबत संपर्क होत नसल्याने तरुणी हताश झाली व याच ठिकाणी रडत बसली. तिच्याकडे काही तरुणांचे लक्ष गेले. तरुणांकडे तरुणीने आपबिती कथन केली. त्यानंतर तरुणांनी तिला एका समाजसेविकेकडे नेले. समाजसेविकेच्या माध्यमातून तरुणीची फसवणूक झाल्याने  तक्रारीसाठी शहर पोलीस ठाण्यात पोहचली. तरुणीच्या तक्रारीनुसार शहर पोलिसांत सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होवून काही तासातच तपासअधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित दानिश यास गेंदालाल मिलमधून अटक केली. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button