मुंब्रै बँक प्रकरण : प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर | पुढारी

मुंब्रै बँक प्रकरण : प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई : पुढारी ऑनलाईन

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. बोगस मजूर प्रकरणी दरेकरांना कोठडीची गरज नाही. माझ्या अशीलास मुद्दामपणे त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, अशी प्रतिक्रिया दरेकरांच्या वकिलांनी दिलीय.

दरेकर यांना ११ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. दरेकर यांच्याविरुद्ध एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी दरेकर यांना दुसऱ्यादा नोटीस बजावली होती.

दरेकर हे मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिले होते. या चौकशी दरम्यान त्याच्यावर दबाव असल्याने त्याच्याकडून ठोस माहिती मिळाली नव्हती. यामुळे पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

आम आदमी पार्टीच्यावतीने दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्‍याचा आरोप त्‍यांच्यावर करण्यात आलाय. त्‍यानंतर दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर मुबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

१०० टक्के सोमय्या पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील

१०० टक्के सोमय्या पोलिसांच्या चौकशीला सामोरे जातील. सरकारच्या दबावाखाली हे सर्व षड्यंत्र होतं. संजय राऊतांनी पुढाकारा घेऊन गृहमंत्र्यांवर दबाव आणला. किरीट सोमय्या हे पळणारे नेते नाहीत, ते पळवणारे नेते आहेत. किरीट सोमय्यांनी अनेक घोटाळे समोर आणले. पोलिस दबावाखली काम करत आहेत. सोमय्या तपासाला सहकार्य करतील. सरकारविरोधात बोलल्याने सोमय्यांवर कारवाई झाल्याचे दरेकर म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Back to top button