राज्यावरील वीज संकट गडद! ज्या ठिकाणी वीज चोरी त्या ठिकाणी भारनियमन : ऊर्जामंत्री नितीन राऊत

राज्यावरील वीज संकट गडद! ज्या ठिकाणी वीज चोरी त्या ठिकाणी भारनियमन : ऊर्जामंत्री नितीन राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क

वीज मागणीत झालेली अभूतपूर्व वाढ, कोळशाच्या टंचाईमुळे राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी, वीज बिल भरुन सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. ज्या ठिकाणी वीज चोऱ्या वाढल्या आहेत त्या ठिकाणी भारनियमन केले जाणार आहे. कोळसा उपलब्ध नाही. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरु आहे. किमान लोडशोडिंग होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

महागडी विकत घेणे सोपे काम नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. वीज मागणीतील वाढ, कोळशाच्या टंचाईमुळे घटलेली वीजनिर्मिती आणि जादा दर देण्याची तयारी असूनही खुल्या बाजारामध्ये उपलब्ध नसलेली वीज यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विजेचे भारनियमन सुरू होण्याची शक्यता आहे. दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्‍लक असून राज्याला कोणत्याही क्षणी मोठ्या भारनियमनाचा सामना राज्यातील जनतेला करावा लागू शकतो, असे स्पष्ट संकेत नितीन राऊत यांनी दिले आहेत.

मुंबई वगळता महाराष्ट्रात मागील वर्षाच्या पूर्वीच्या तुलनेत विजेची मागणी तब्बल 4 हजार मेगावॅटने वाढली आहे. गेल्या . पंधरवड्यापासून विजेची मागणी तब्बल 24500 ते 24800 मेगावॅटवर पोहोचली. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता ही मागणी 25500 मेगावॅटवर जाईल, अशी स्थिती आहे. रात्रीच्या कालावधीतदेखील 22500 ते 23000 मेगावॅट विजेची मागणी आहे. यापेक्षा जास्त मागणी वाढल्यास ते पुरवणे शक्य होणार नाही, अशा शब्दात ऊर्जामंत्र्यांनी अगतिकता व्यक्‍त केली.

कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणच्या औष्णिक वीजनिर्मितीत घट झाली आहे. काही औष्णिक संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद आहेत. परिणामी, महावितरणला औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल 6000 मेगावॅटने कमी वीज उपलब्ध होत आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काय आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास ? | कोल्हापूर उत्तर पोटनिवडनूक 2022

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news