नाशिक : योगशिक्षकांचे पालकमंत्र्यांना साकडे ; केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या | पुढारी

नाशिक : योगशिक्षकांचे पालकमंत्र्यांना साकडे ; केल्या 'या' महत्वाच्या मागण्या

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय योगशिक्षक महासंघातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना योगशिक्षकांचे 11 सूत्री मागणीपत्राचे निवेदन देण्यात आले. या निवेदनातून काही महत्वाच्या मागण्या महासंघातर्फे करण्यात आल्या आहे. 

निवेदनानुसार, एमपीएससीमध्ये योग विषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता यावी. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आरोग्यवर्धिनीमार्फत योगसत्र आणि शिक्षकास नियमित करावे तथा मानधन वाढवून द्यावे, शासकीय व निमशासकीय आस्थापनामध्ये योगा ब्रेक नियमित करावा, यासाठी एक तज्ज्ञ योगशिक्षक नेमावा, योग विषयास सेट परीक्षेत सामील करावे, महाराष्ट्र पोलिस खात्यात योगशिक्षक नियमित करावा, जिल्हा सामान्य रुग्णालयात योग केपिस्टच्या जागा भराव्यात, ग्रामीण तथा शहरी भागातील २० वर्षांपासून निःशुल्क सेवा देणाऱ्या योगशिक्षकास लोककलावंताप्रमाणे मानधन द्यावे, योग विषयाला पूर्णतः अनुदानित करावे, योग विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी, मराठी साहित्य संमेलनाप्रमाणे दरवर्षी योग संमेलनाचे शासनाने आयोजन करावे, त्याकरिता संघटनेस अनुदान द्यावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

निवेदनावर जिल्ह्याचे अध्यक्ष यू. के. अहिरे, उपाध्यक्ष अशोक पाटील, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, महासचिव वैशाली पाटील, सचिव गीता कुळकर्णी, सदस्य माया बुरुकुल, सदस्य विनोदकुमार भट, सदस्य अंजली भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button