नाशिक : अॅड. उत्तमराव ढिकले पंचवटी वाचनालयाचे मानाचे पुरस्कार जाहीर | पुढारी

नाशिक : अॅड. उत्तमराव ढिकले पंचवटी वाचनालयाचे मानाचे पुरस्कार जाहीर

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
अॅड. उत्तमराव नथुजी ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून दरवर्षी वाचनालयाचे संस्थापक सहकारमहर्षी अॅड. उत्तमराव नथुजी ढिकले यांच्या स्मरणार्थ व वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त पंचवटीतील कर्तबगार व्यक्तींना दिले जाणारे ‘पंचवटी भूषण’, ‘पंचवटी गौरव’ व ‘आदर्श ग्रंथपाल’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. गुरुवारी (दि.७) सायंकाळी ५.३० वाजता वाचनालयाच्या सभागृहात होणाऱ्या सन्मान सोहळ्यात विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पंचवटीतील १२ कर्तबगार व्यक्तींचा सन्मान होणार आहे. याप्रसंगी आमदार अॅड. राहुल ढिकले यांची प्रमुख उपस्थिती तर मविप्र संस्थेचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

मागील दोन वर्षापासून कोविड काळात हा सोहळा घेता आला नव्हता. म्हणून या वर्षी तीन ‘पंचवटी भूषण’, सहा ‘पंचवटी गौरव’, दोन कोविड योद्धा ‘पंचवटी गौरव’ आणि एक ‘आदर्श ग्रंथपाल’ अशा बारा कर्तबगार व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याचे वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी दौलत देवरे यांनी सांगितले.

या गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.डाॅ.शांताराम रायते, नथुजी देवरे, हिरालाल परदेशी, धनंजय धनवटे, सुभाष पाटील, उल्हास धनवटे, मंदार जानोरकर, सुहास खालकर, संजय नेरकर, ग्रंथपाल योगिता भामरे, निकेतन शिंदे यांनी केले आहे.

…यांचा होणार सन्मान
मधुकर शंकराव जेजुरकर, डाॅ. अरुण शिवाजीराव गुंजाळ, रावसाहेब सुखदेव मोरे (पंचवटी भूषण), कु. ओवी सचिन व्यवहारे, कु. पुनम पंडित तांबे, पवन वसंत खोडे, सचिन अशोकराव भोसले, गजानन माधव देवचके, डॉ. मिथिला चव्हाण (पंचवटी गौरव), चंद्रकला विठ्ठल शिरसाट, योगेश विजय खैरनार (कोविड योद्धा पंचवटी गौरव), प्रा. संभाजी ह्याळीज (कै.ल.स.वैद्य आदर्श ग्रंथपाल पुरस्कार).

हेही वाचा :

Back to top button