"रोहित तू बिंदास्त..." रोहित पाटील यांनी शेअर केला नितीन गडकरी यांच्‍या भेटीचा किस्‍सा | पुढारी

"रोहित तू बिंदास्त..." रोहित पाटील यांनी शेअर केला नितीन गडकरी यांच्‍या भेटीचा किस्‍सा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या भेटीचा किस्‍सा आणि त्‍यांचे आभार मानणारी पोस्‍ट फेसबुकवर शेअर केली आहे. रोहित पाटील यांनी नुकतीच दिल्‍लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीचा किस्‍सा यांनी फेसबुल पोस्‍टवर लिहिला आहे.

पोस्‍टमध्‍ये रोहित पाटील यांनी म्‍हटलं आहे की, “दिल्ली मध्ये महाराष्ट्र असणं गरजेचं आहे” ह्या वाक्याची प्रचिती आज आली. “आणि रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेलं काम झालं असं समज” हे वाक्य धीराचे होते. आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. तासगाव बाह्यवळण रस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपूर्ण राहिले आहे. स्व. आबा असताना ह्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मानस त्यांचा होता. ह्या रस्त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व नवीन तरुणांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध या रस्त्यामुळे होऊ शकते आणि शहरातील दळणवळण साठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतो हे पटवून दिले. त्यामुळे सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती त्यांना केली. नक्कीच हा बाह्यवळण रस्ता तासगावच्या विकासासाठी नवी नांदी असेल हा विश्वास मला आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा अशी विनंती केली. सदर दोन्ही कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली. त्याचबरोबर साहेबांनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले.

हेही वाचलं का? 

Back to top button