पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे कामही सुसाट | पुढारी

पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे कामही सुसाट

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : देशात खासगी संस्थेच्या साह्याने उभारण्यात येणारा पहिला मेट्रो रेल्वे प्रकल्प पुण्यात साकारला जात असून, शहरातील हा तिसरा मेट्रो मार्ग हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान 23 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गावरील खांब उभारण्यासाठी पायलिंगचे काम वेगाने सुरू झाले आहे. पुण्यातील महामेट्रोच्या दोन मेट्रो मार्गांवरील काही भागांत मेट्रो धावण्यास सहा मार्चला प्रारंभ झाल्यानंतर तिसर्‍या मेट्रोचेही काम सुरू झाले आहे.

Karnataka hijab row : कर्नाटकातील हिजाब वादात अल-कायदाची एंट्री! अल- जवाहिरीनं जारी केला व्हिडिओ, मुस्कान खानचं केलं कौतुक

खांबाच्या पायासाठी 308 पायलिंग घेण्यात आले आहेत. त्यावर पन्नासपेक्षा अधिक खांब लवकरच बांधले जातील. हिंजवडी, बाणेर आणि गणेशखिंड रस्ता या तीन ठिकाणी हे काम एकाच वेळी हाती घेण्यात आले आहे. पूल बांधणीसाठी आवश्यक असलेले सेगमेंट बनविण्यासही सुरुवात झाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (टाटा आणि सिमेन्स यांचा संयुक्त भागीदारी प्रकल्प) यांच्या माध्यमातून मेट्रोचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, जमीन ताब्यात आल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्यात आला. सध्या प्रकल्पाची 98 टक्के जमीन ताब्यात आली आहे. तीन वर्षांत मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रत्येक दिवसाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे.

श्रीलंकेतील आणीबाणी मागे, राजधानी काेलंबाेमध्‍ये चीनविरोधात निदर्शने

ताथवडे येथे सुसज्ज कास्टिंग यार्ड

पीएमआरडीएने ताथवडे येथील यशदाची 39 एकर जागा कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या स्वरूपात घेतली. तेथे टाटा प्रोजेक्ट्सने पुलासाठीची सेगमेंट निर्मिती सुरू केली. मेट्रोचा पूल बांधताना दोन खांबांमध्ये दहा ते बारा सेगमेंट वापरले जाणार आहेत. ताथवडे येथे पहिल्या सेगमेंटचे कास्टिंग 18 फेब्रुवारी रोजी सुरू झाले. या प्रकल्पासाठी 23.3 किलोमीटर अंतरात पूल बांधण्यासाठी साडेनऊ हजार सेगमेंट्स लागणार आहेत. कास्टिंग यार्डमधील जागेत एकूण 7 भाग केले आहेत. पहिला भाग मेट्रोशी निगडीत बांधकामासाठी लागणारे मेटल कटिंग करण्यासाठी वापरला जाईल. दुसर्‍या व तिसर्‍या भागात 100 टन क्षमतेच्या दोन गँट्री क्रेन्स उभारल्या आहेत. त्यांच्या साहाय्याने सेगमेंटची निर्मिती प्रक्रिया राबवली जात आहे. एका सेगमेंटची लांबी 3.2 मीटर असून, त्याचे वजन अंदाजे 50 टनापर्यंत असते. या कास्टिंग यार्डमध्ये चारशे कामगारांची निवास व भोजनाचीही सोय केली आहे.

RRR ने जमवला ९०० कोटींचा गल्ला, टीमला दिली सोन्याची नाणी

खांब उभारणीस प्रारंभ

तीन ठिकाणी पायलिंगचे काम सुरू झाले आहे. पायलिंग म्हणजे जमिनीमध्ये पाया घेण्यासाठी खोदकाम करून त्यात काँक्रिटीकरण केले जाते. असे चार ते सहा पायलिंग झाल्यानंतर, त्यावर खांबासाठी पाया बांधून त्यावर खांब उभारला जातो. गणेशखिंड रस्त्यावर तीन खांब उभारणीस नुकतीच सुरुवात झाली आहे.

देवेंद्र फडणवीस : एक मुख्यमंत्री घेऊन पक्षाची काय अवस्था केली, फडणवीसांची राऊतांवर टीका

ताथवडे येथे मेट्रोच्या सेगमेंट निर्मितीसाठी उभारलेले कास्टिंग यार्ड. दुसर्‍या छायाचित्रात गणेशखिंड रस्त्यावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गासाठी खांबांची उभारणी झालेली दिसत आहे.

संजय राऊत संतप्त, किरीट सोमय्यांना केली अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

  • प्रकल्पाचा अंदाजे खर्च : 8 हजार कोटी रुपये
  • मेट्रो मार्गाचे अंतर : 23.3 किलोमीटर
  • मेट्रो स्थानके : 23
  • मेट्रोचे खांब : 893
  • जमिनीचा ताबा : 98 टक्के

Back to top button