नाशिक : प्लास्टिक बंदीसाठी मनपाचा टास्क फोर्स | पुढारी

नाशिक : प्लास्टिक बंदीसाठी मनपाचा टास्क फोर्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्लास्टिक बंदीसाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स अर्थात विशेष कृती दल स्थापन करण्याचे आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले आहेत. या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्वसमावेशक कृती आराखडा तयार केला जाणार आहे. प्लास्टिक कचऱ्याचे मूल्यमापन, संकलन, पुर्नवापर आणि विल्हेवाट यासंदर्भात टास्क फोर्स धोरण आखणार आहे.

राज्य शासनाने सिंगल युज प्लास्टिकचा वापर, विक्री आणि त्याचा साठा करण्यावर बंदी आणलेली आहे. या बंदीची अंमलबजावणी करण्याकरता राज्य पातळीवर विशेष कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार या टास्क फोर्सच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

शहरात निर्माण होत असलेल्या प्लास्टिक कचऱ्याचे मूल्यमापन करून त्याचे संकलन, पुनर्वापर आणि अंतिम विल्हेवाट यासंदर्भात धोरण आखणे आणि सिंगल युज प्लास्टिकचा वापर बंद करण्यात येणार आहे. सिंगल यूज प्लास्टिकला पर्यायी साधनांची निश्चिती करून त्याचा वापर करणे, नियमांच्या अंमलबजावणीसाठी सुयोग्य संनियंत्रण व्यवस्था उभारणी, प्लास्टीक कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा किमान वापर, पुनर्वापर, याबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम आखण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button