औरंगाबाद : दारू का पिता? विचारणा करत बापाचा मुलाकडून खून
औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : नेहमी दारूड्यांसोबत राहता, दारू का पिता, अशी विचारणा करत मुलाने बापाच्या डोक्यात घन घालून खून केला. यावेळी त्याने मोठ्या भावालाही जखमी केले. ही घटना औरंगाबाद तालुक्यातील चिंचोली येथे शनिवारी रात्री घडली. कडूबा भाऊराव घुगे (वय ६५) असे मृताचे नाव असून, मच्छिंद्र कडूबा घुगे असे जखमी झाला आहे. संशयित आराेपी नानासाहेब कडूबा घुगे (वय २५) याला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडूबा घुगे हे मच्छिंद्र आणि नानासाहेब मुलांसाेबत राहत हाेते. दारुचे व्यसन असल्याने मुलांसोबत त्यांचा नेहमी वाद असे. शनिवारी ( दि. २) कडूबा दारू पिऊन घरी आले. नानासाहेब याने दारू का पिता? दारुडे मित्रांसोबत का राहता?, अशी त्यांना विचारणा केली. दाेघांमध्ये वादावादी झाली. यावेळी नानासाहेब याने कडूबा यांच्या डाेक्यात लोखंडी घन घातला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने भाऊ मच्छिंद्र (वय २७) याच्यावरही लोखंडी घणाने हल्ला केला. कडूबा यांच्या पत्नीने फिर्याद दिली. नानासाहेब याला चिकलठाणा पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचलंत का?
- जिंदगी 'गुलजार' है ! फक्त या महिला IAS अधिकाऱ्यासारखं मनसोक्त नाचता आलं पाहिजे (video)
- बेळगाव : सब-रजिस्ट्रार, तहसीलदारांकडूनच जमिनीचा गैरव्यवहार? ; 16 जणांविरुद्ध तक्रार नोंद
- पेट्रोलची सव्वाशेकडे दमदार वाटचाल, मोदी सरकारकडून फक्त ११ दिवसांत ७ रुपये ८० पैशांची वाढ
- "अॅमेझॉनला आम्हाला नष्ट करायचे होते आणि ते यशस्वी झाले…" : अॅमेझॉनशी वादात फ्यूचर रिटेल ने SC मध्ये सांगितले

