धुळे : साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन | पुढारी

धुळे : साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे 'महागाई मुक्त भारत' आंदोलन

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारच्या विरोधात “महागाई मुक्त भारत” आंदोलन करण्यात आले.

साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सकाळी अकराच्या सुमारास साक्री तहसील कचेरीसमोर स्कूटर, मोटरसायकल, गॅस सिलेंडर यांची महापूजा करुन हे आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे माजी खासदार बापूसाहेब चौरे, उत्तम देसले, पंचायत समितीचे सभापती प्रतिभा सूर्यवंशी, कॉंंग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, पंचायत समितीचे गटनेते शांताराम पवार, सरचिटणीस गणेश गावित, पंकज सूर्यवंशी, सचिव सूर्यवंशी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष अविनाश शिंदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजित गवळी, काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, सरपंच युवराज चौरे, याकुब पठाण, नदीम पठाण, दिनेश बोरसे, किशोर पाटील, कमलाकर मोहिते, काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा :

पहा व्हिडिओ : ऊर्जेची गरज असते तेव्हा शिवतांडव स्तोत्र म्हणते :अमृता फडणवीस

Back to top button