नाशिक : गंगापूर परिसरात भरदिवसा चोरी | पुढारी

नाशिक : गंगापूर परिसरात भरदिवसा चोरी

नाशिक : इमारतीच्या वॉचमन रूममधून चोरट्याने सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी केशव मधुकर काळे (41) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. काळे यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.28) सकाळी 9 च्या सुमारास शिवसृष्टीनगर परिसरातील प्रसाद अपार्टमेंटच्या वॉचमन खोलीत चोरी झाली. चोरट्याने खोलीतील 50 हजार रुपयांची रोकड, 99 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button